माजी आमदाराचा मुलगा घरातून पळाला, गुजरातमध्ये चोर बनला; कारण ऐकून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 21:03 IST2025-02-02T20:50:24+5:302025-02-02T21:03:50+5:30
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर माजी आमदाराच्या चोर मुलाला पकडले.

माजी आमदाराचा मुलगा घरातून पळाला, गुजरातमध्ये चोर बनला; कारण ऐकून बसेल धक्का...
Gujarat : प्रेमात वेडे झालेले लोक काहीही करायला तयार असतात. यामुळे त्यांना आयुष्यभर पश्चातापही करावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमधून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील मनसा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदाराचा मुलगा आपल्या मैत्रिणीच्या गरजा भागवण्यासाठी चक्क चोर बनला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडच्या गरजा भागवण्यासाठी माजी आमदाराचा मुलगा चक्क चेन स्नॅचर बनला. प्रद्युम्न सिंग चंद्रावत, असे या आरोपीचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील मानसा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विजेंद्र सिंह चंद्रावत यांचा मुलगा आहे. 25 जानेवारीच्या संध्याकाळी प्रद्युम्न सिंग याने एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली.
आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, तो घरातून पळून आला होता अन् अहमदाबादमध्ये 15 हजार रुपये पगारावर काम करत होता. यादरम्यान तो एका मुलीच्या प्रेमात पडला. 15,000 रुपयांच्या पगारातून प्रेयसीच्या गरजा भागवता न आल्याने त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. तो शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरायला लागला. अलीकडेच त्याच्या आरोपीला आपल्या मैत्रिणीला 15 हजार रुपयांचे महागडे गिफ्ट द्यायचे होते. यासाठी त्याने 25 जानेवारी रोजी एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला पकडले.
आरोपीचे वडील कोण आहेत?
माजी आमदार विजेंद्र सिंह चंद्रावत 2008 मध्ये मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील मानसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला.