शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी, स्पष्ट धोरण नाही; कपिल सिब्बल यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:00 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या. कोरोनाविषयक लढ्यात केंद्राकडे स्पष्ट धोरण नाही, सिब्बल यांची टीका

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या.कोरोनाविषयक लढ्यात केंद्राकडे स्पष्ट धोरण नाही, सिब्बल यांची टीका

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येताना दिसतोय. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून केंद्रावकर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्रावर निशाणा साधला आहे. बुधवारी नैनिताल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.हेही वाचा - देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा

"कोरोनाचं नियंत्रण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. मोदी सरकारकडे कोरोना विरोधात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट धोरण नाही. यामुळेच आज देशातील परिस्थितीत बिकट होत चालली आहे. पूर्ण बहुमत असूनदेखील आज देशाच्या समोर नेतृत्वाचं संकट उभं राहिलं आहे," असं सिब्बल म्हणाले. 

स्पष्ट धोरण आखण्यास सरकार अयशस्वी"देशातील कोरोनाची संसर्गाची परिस्थितीत हाताबाहेर देी आहे. सध्या दर आठवड्याला २० हडार लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत सरकार कोरोनाविषयक स्पष्ट धोरण आखण्यास अयशस्वी ठरलं आहे. देशात आरोग्य सेवांच्या अभावामुळे अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. सरकार लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेडदेखील उपलब्ध करून देऊ शकत नाहीये," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.लढाई एकत्र लढायची आहेनुकत्या निकाल लागलेल्या पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेच्या स्थितीवर उत्तर देताना सिब्बल यांनी या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगितलं. तसंच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा या विषयावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. कोरोना विरोधातील लढाई आपल्याला एकत्र लढायची आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदी