शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मी धाडसी योद्ध्याची पत्नी! पती अटकेत अन् लग्नाचा १८ वा वाढदिवस; कल्पना सोरेन भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:43 IST

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होऊन आठवडा उलटला आहे.

आदिवासी राज्य म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या झारखंडचे राजकारण मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होऊन आठवडा उलटला आहे. जमीन घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांनी त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. खरं तर आज बुधवारी त्यांच्या लग्नाचा अठरावा वाढदिवस आहे. पण या खास दिवशी पती सोबत नसल्याने कल्पना सोरेन यांनी एक भावनिक पोस्ट केली अन् हेमंत सोरेन यांच्या धाडसाला दाद दिली. 

कल्पना सोरेन म्हणाल्या की, आज प्रथमच आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आमच्यासोबत हेमंत सोरेन नाहीत. त्यांनी झारखंडचे अस्तित्व आणि अस्मिता जपण्यासाठी नतमस्तक होणे कधीही स्वीकारले नाही. षडयंत्राचा सामना करणे आणि त्यास पराभूत करण्यासाठी स्वतःला समर्पित करणे हे त्यांना चांगले वाटले. आम्हाला विश्वास आहे की ते या कटाचा नक्कीच पराभव करतील आणि विजयी होऊन लवकरच आमच्यासोबत सामील होईल. झारखंडीच्या योद्ध्याची मी पत्नी आहे. आज मी भावनिक होणार नाही. हेमंत सोरन यांच्याप्रमाणे मी देखील कठीण प्रसंगातही हसत राहीन आणि त्यांचे धैर्य आणि संघर्षाचे बळ बनेन. 

हेमंत सोरेन यांना ईडीने जमिनीशी संबंधित एका घोटाळ्यात अटक केली. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती, मात्र अखेरच्या क्षणी चंपई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले. झारखंडच्या नव्या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. दरम्यान, पती तुरुंगात गेल्यानंतर कल्पना सोरेन राजकारणात सक्रिय झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांची नुकतीच भेट घेतली. कल्पना सोरेन बुधवारी एजन्सी कार्यालयात जाऊन हेमंत सोरेन यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडChief Ministerमुख्यमंत्रीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय