शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, आज 32 महिने झाले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:24 IST

गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता

ठळक मुद्देगेल्या 32 महिन्यांपासून तुरुंगात राहूनही त्यांनी गुन्ह्याची कबुली केली नाही, याउलट न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पहिली सुनावणी 30 मार्च 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयात होत आहे.

सुरत - राज्यातील राजकारणात सचिन वाझे अन् परमबीर सिंग यांच्यामुळे वादंग उठले असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे नाव घेऊन केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं होतं. संजीव भट्ट प्रकरणावरुन गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय चालतो का?, असा प्रश्नच राऊत यांनी उपस्थित केला होता. राऊत यांनी ज्या संजीव भट्ट यांच्या नावाचा उल्लेख केला होता, त्या संजीव भट्ट यांच्या पत्नीने संजीव भट्ट यांच्या ट्विटर हँलडवरुन भावनिक आवाहन केलंय. गेल्या 32 महिन्यांपासून संजीव भट्ट तुरुंगात असल्याचे त्यांनी सांगितलं.   

गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता. त्यामुळे, गुजरातमधील संजीव भट्ट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता, संजीव भट्ट यांच्या पत्नीने ट्विट करुन भावनिक साद घातली आहे. आज 2 वर्षे 8 महिने आणि 9 दिवस झाले की, संजीव भट्ट यांना चुकीच्या पद्धतीने राजकीय षड्यंत्रात अडकवून तुरुंगात टाकण्यात आले आहे. संजीव यांच्या मुखातील सत्य दाबण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं.  गेल्या 32 महिन्यांपासून तुरुंगात राहूनही त्यांनी गुन्ह्याची कबुली केली नाही, याउलट न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पहिली सुनावणी 30 मार्च 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयात होत आहे. त्यामुळे, सत्य आणि न्याय मिळेल यासाठी आपण प्रार्थना करत आहे, न्यायाची अपेक्षा आहे, असे संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांनी म्हटलंय. 

दरम्यान, संजय राऊत यांनी महाराष्ट्रात परमबीर सिंह यांच्या पत्रावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबतच्या पत्रकार परिषदेत संजीव भट्ट यांच्या नावाचा उल्लेख करत भाष्य केलं. मात्र, त्यांचा पूर्ण रोख 'गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय' यावर होता., 

पालनपूरच्या तुरुंगात संजीव भट्ट

संजीव भट्ट यांना जामनगरच्या सेशन्स कोर्टाने जून २०१९ मध्ये नोव्हेंबर १९९० मध्ये जामजोधपूर येथे राहणार्‍या प्रभुदास वैष्णानीच्या मृत्यूप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचे निर्देश दिले होते. २०११ मध्ये २००२ च्या दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप करणाऱ्या अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते आणि ते सध्या पालनपूर तुरूंगात आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत गुजरात हायकोर्टाने त्यांची शिक्षा निलंबित करण्याच्या नकारला आव्हान दिले गेले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये गुजरात हायकोर्टाने न्यायालयांबद्दल कमी आदर असल्याचे सांगितले आणि न्यायालयाने दिशाभूल करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला असे सांगून त्यांची शिक्षा निलंबित करण्यास नकार दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliceपोलिसGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी