शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॉकी संघाचे कर्णधार ते 'राजकारण', एअर इंडियाची नोकरी सोडून केला काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 19:25 IST

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज ओडिशाच्या काँग्रेस भवनात झालेल्या मेळाव्याला हजेरी लावली. प्रबोध यांच्यासोबत एकमरा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते प्रसन्नकुमार चंपती यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरत पटनायक यांसह राज्यातील नेते उपस्थित होते. 

आर्थिक संकटातून मोठ्या उंचीपर्यंतचा प्रवासउल्लेखनीय बाब म्हणजे प्रबोध तिर्की यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९८४ रोजी बालीशंकरा भागात असलेल्या लुलुकीडीही या हॉकी गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अनेक अडचणी असूनही प्रबोध यांनी त्यांचा मोठा भाऊ इग्नेस तिर्की यांच्यासोबत हॉकी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना हॉकी स्टिक विकत घेणे शक्य नसल्याने ते बांबूच्या काठीने हॉकीचा सराव करत असत. त्यांच्यासाठी गावातील रस्ता म्हणजे हॉकीचे मैदान होते. बांबूची काठी आणि गावाकडच्या वाटेने प्रवास सुरू करणाऱ्या इग्नेश आणि प्रबोध यांनी पुढे भारतीय हॉकी संघात महत्त्वाचे स्थान निर्माण करून राज्य आणि देश पातळीवर नाव कमावले.

राजकीय खेळीची घोषणाप्रबोध तिर्की यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. २००७ मध्ये आशिया चषक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. १६१ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या प्रबोध यांना एकलव्य पुरस्कार आणि बिजू पटनायक राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हॉकी खेळल्यानंतर त्यांनी पुढील १८ वर्षे एअर इंडियामध्ये काम केले. मग त्यांनी ३१ जुलै रोजी नोकरीला रामराम करण्याचा निर्णय घेतला अन् आपले गाव गाठले. आता त्यांनी काँग्रेसचा हात धरून आपली राजकीय खेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :Odishaओदिशाcongressकाँग्रेसHockeyहॉकीasia cupएशिया कप 2023