शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण्यांनीच पोलिसांना सलाम करायला हवा कारण...", गंभीरचं मनोबल वाढवणारं भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 17:19 IST

BJP MP Gautam Gambhir Speech: गंभीरने पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोबल वाढवणारे भाषण केले.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोबल वाढवणारे भाषण केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गंभीरने राजकीय खेळी सुरू केली आणि तो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडून आला. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या गंभीरने समाजासाठी योगदान आणि बलिदान देणाऱ्या पोलीस बांधवांचे आभार मानले. गंभीरने सोशल मीडियावर त्याच्या भाषणाची झलक शेअर केली आहे. यामध्ये तो क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात पोलिसांच्या कार्याला दाद देताना दिसतो. २०११ च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ९७ धावा करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा गंभीर २०१९ पासून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाला. त्याने पूर्व दिल्लीतून लोकसभेची निवडणूक जिंकली अन् खासदार होण्याचा मान  पटकावला. २०२२ आणि २०२३ मध्ये तो आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या कार्यक्रमात गौतम गंभीरला आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस हेच भारताचे खरे हिरो आहेत, असे प्रतिपादन करताना गंभीरने पोलिसांच्या बलिदानाबद्दल त्यांचे आभार मानले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "पोलिसांनी कोणत्याही नेत्याला अथवा खासदाराला सलाम करण्याची गरज नाही, तर आम्हीच तुम्हाला सलाम केला पाहिजे कारण तुम्ही खऱ्या अर्थाने त्याग करता."

"पोलीस सर्वात मोठे हिरो, त्यांची वर्दी हीच देशाची ताकद"उपस्थितांना संबोधित करताना गंभीर म्हणाला की, मला एक गोष्ट समजत नाही की, जेव्हा एखादा खासदार किंवा राजकारणी येतो तेव्हा पोलीस बांधव त्यांना सलाम करतात. यामध्ये कधी बदल होईल मला माहिती नाही. खरं तर सर्वकाही याउलट व्हायला हवे. राजकारण्यांनी तुम्हाला सलाम केला पाहिजे. कोणताही राजकारणी किंवा बॉलिवूड अभिनेता तुमच्यासारखा त्याग करत नाही. पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी आणि होळी साजरी करता येत नाही. कारण जनतेला हे सण साजरे करता यावेत. तुम्ही पोलीस बांधव आपल्या देशाचे सर्वात मोठे हिरो आहात आणि तुमची वर्दी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरdelhiदिल्लीPoliticsराजकारणPoliceपोलिसBJPभाजपा