शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जेडीयूमध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी, नितीश कुमारांनी बनवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 17:04 IST

manish verma : आर सीपी सिंह यांच्यानंतर मनीष वर्मा हे नितीश कुमार यांच्या पसंतीचे दुसरे आयएएस अधिकारी आहेत.

पटणा : माजी आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अतिरिक्त सल्लागार मनीष वर्मा यांना जेडीयूमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी मनीष वर्मा यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवले आहे. नुकताच मनीष वर्मा यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आर सीपी सिंह यांच्यानंतर मनीष वर्मा हे नितीश कुमार यांच्या पसंतीचे दुसरे आयएएस अधिकारी आहेत. आधी त्यांनी अधिकारी म्हणून नितीश कुमार यांच्यासोबत काम केले आणि आता जेडीयूमध्ये दाखल झाले आहेत. एकेकाळी आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी मानले जात होते, पण आता ते पक्षात नाहीत. यानंतर आता नितीश कुमार यांनी मनीष वर्मा यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे.

विशेष राज्य दर्जा किंवा विशेष पॅकेजवर चर्चायापूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संजय झा यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना कार्यवाह अध्यक्ष करण्यात आले. या बैठकीत बिहारला विशेष राज्याचा दर्जा किंवा विशेष पॅकेज या मुद्द्यावरही चर्चा झाली.

नितीश कुमारांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवणारझारखंड विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्याबाबतही चर्चा झाली. २०२५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील, असे स्पष्टपणे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 

नितीश कुमार नेहमीच एनडीएचा भाग राहतीलनेहमीच एनडीएचा भाग असतील, असे स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर घोषणा केली आहे, असे जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एका बैठकीनंतर सांगितले होते. तसेच, राज्याला विशेष दर्जा आणि पॅकेज मिळावे यासाठी आम्ही लढत राहू. बिहार उच्च न्यायालयाने आरक्षणावर बंदी घातल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही केसी त्यागी म्हणाले होते.

टॅग्स :BiharबिहारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमार