माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:26 IST2025-11-04T09:26:15+5:302025-11-04T09:26:38+5:30
Haryana Crime News: माजी क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना हरियाणामधील सोनिपत येथे घडली आहे. रामकरण असं या मृत क्रिकेट प्रशिक्षकाचं नाव असून, ते पत्नी आणि सुनेसोबत एका विवाह सोहळ्याला जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना हरियाणामधील सोनिपत येथे घडली आहे. रामकरण असं या मृत क्रिकेट प्रशिक्षकाचं नाव असून, ते पत्नी आणि सुनेसोबत एका विवाह सोहळ्याला जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. दरम्यान, रामकरण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी त्यांच्या मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. निवडणुकीतील राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना गन्नौर येथील आहे. काल संध्याकाली येथील प्रभाग क्रमांक-१२ च्या नगरसेविका सोनिया शर्मा यांचे सासरे रामकरण शर्मा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी असलेला सुनील उर्फ लंबू हा आधी नगरपालिकेचा काळजीवाहून चेअरमन राहिलेला आहे. या घटनेदरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी लोकांनी धाव घेतली. मात्र आरोपी सुनील घटनास्थळावरून फरार झाला.
रामकरण हे एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत जात होते. यादरम्यान, जैन गल्लीजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. नगरपालिका निवडणुकीतील वादातून आरोपींनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. रामकरण यांच्या सुनेने नगरपालिकेच्या निवडणुकीत आरोपी सुनील याच्या पत्नीचा पराभव केला होता.