शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 8:32 PM

HD Kumaraswamy On Siddaramaiah : शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला.

HD Kumaraswamy On Karnataka Govt : सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला. हा सामना पाहण्याठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्याच्या मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सडकून टीका केली आहे. बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी यांनी सांगितले की, राज्य अडचणीत असताना सरकार मात्र क्रिकेट सामने पाहण्यात व्यग्र आहे. 

राज्य सरकारवर टीका करताना कुमारस्वामी म्हणाले, "काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असता तर चालले असते पण सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा होता. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला की ऑस्ट्रेलियाला? राज्यात जनतेचे हाल होत असून सरकार क्रिकेटचा सामना पाहत आहे."

"राज्य सरकारमधील नेत्यांनी निधीसाठी केंद्राला पत्र लिहून वेळ मागितली पाहिजे. जनतेने आम्हाला सत्ता दिली, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. पण, सरकारमधील टक्केवारी आणि भ्रष्टाचार यावर लोक बोलत आहेत. काँग्रेसवाले बोलतात की, आम्ही जे बोललो ते केले पण शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे त्याचे काय? राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत आहे का? सरकारने केंद्राशी पत्रव्यवहार केला का? राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधायला हवा", असेही कुमारस्वामी यांनी नमूद केले. 

कुमारस्वामी यांची राज्य सरकारवर टीकाकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी ७ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, राज्य सरकारने केंद्राकडे पीक नुकसान भरपाईसाठी ४,८६० कोटी रुपयांचे आवाहन केले आहे. मनरेगाची थकबाकीही केंद्राकडे मागितली आहे. यावर कुमारस्वामी म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि काही भागात पिकाच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या आहेत. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपPakistanपाकिस्तानkumarswamyकुमारस्वामीAustraliaआॅस्ट्रेलिया