माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांची प्रकृती गंभीर; हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 22:29 IST2019-08-07T22:29:03+5:302019-08-07T22:29:37+5:30
गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी केल्यानंतर 27 जुलैला ते घरी परतले होते.

माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांची प्रकृती गंभीर; हॉस्पिटलमध्ये दाखल
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेता बाबुलाल गौर यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना गंभीर स्थितीत नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
काही वेळापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी केल्यानंतर 27 जुलैला ते घरी परतले होते. बुधवारी रात्री त्यांची पुन्हा तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर राजेश शर्मा यांनी गौर यांची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अँजिओप्लास्टीमुळे ते कमकुवत झाले आहेत. हृदय देखील कमकुवत झाले आहे. तसेच वयामुळेही सुधारणा होण्यास वेळ लागत आहे.
गेल्या महिन्यात हृदयाच्या विकारामुळे गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये गौर यांना दाखल करण्यात आले होते. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या तीन नसा बंद असल्याचे आढळले होते. मात्र, गौर यांचे वय जास्त असल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याबाबत साशंक होते. यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याने औषधांवर उपचार सुरु केले होते.