शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भाजपा नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची गळफास घेऊन आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:05 PM

Rajinderpal Singh Bhatia : राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे आमदार म्हणून निवडून आले होते. रमण सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रजिंदरपालसिंग भाटिया यांना मंत्रिपदही देण्यात आले होते.

रायपूर - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहनमंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया (Rajinderpal Singh Bhatia)यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग यांनी गळफाय घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे आमदार म्हणून निवडून आले होते. रमण सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रजिंदरपालसिंग भाटिया यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवून सीएसआयईडीसीचे चेअरमन बनवण्यात आले होते. (Former Chhattisgarh minister and BJP leader Rajinderpal Singh Bhatia commits suicide by strangulation)

२००३ मध्ये रजिंदरपाल सिंग भाटिया यांना भाजपाने तिकीट दिले होते. तसेच मंत्रीही बनवले होते. मात्र २००८ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. २०१३ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. मात्र त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग भाटिया राजनांदगावमधील छुरिया परिसरामध्ये आपल्या धाकट्या भावासह वास्तव्यास होते. रविवार संध्याकाळी ते घरी एकटे होते. कुटुंबीय जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांना ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तसेच प्रकृतीमुळे चिंतीत होते.

रजिंदरपाल सिंग भाटिया यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्यातरी घटनास्थळावर सुसाईड नोट आढळून आलेली नाही. पोलीस सध्या त्यांच्या कुटुंबीयांकडे अधिक चौकशी करत आहेत.  दरम्यान, माजी मंत्री आणि खुज्जी येथील माजी आमदार रजिंदरपाल सिंग भाटिया यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपा