शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कट रचून लीक केलं गेलं माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं पुस्तक, तपासाचे धागेदोरे पोहोचले परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:48 IST

Former Army Chief Manoj Naravane Book News: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नरवणे यांचं हे पुस्तक लीक करण्यामागे व्यापक कटकारस्थान असल्याची माहिती  समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अनिवार्य परवानगीशिवाय नियोजनबद्धरीत्या हे पुस्तक लीक करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याचा दावा सुत्रांनी केला आहे. 

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकातील काही मुद्दे अधोरेखित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, नरवणे यांचं हे पुस्तक लीक करण्यामागे व्यापक कटकारस्थान असल्याची माहिती  समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अनिवार्य परवानगीशिवाय नियोजनबद्धरीत्या हे पुस्तक लीक करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केलं आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पुस्तकाचं वितरण कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये झालं आहे. एवढंच नाही तर  या देशांमध्येच हे पुस्तक सर्वप्रथम ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. ही बाब लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हेगारी कृत्यांच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियापर्यत पोहोचली आहे.

या पुस्तकाची लीक झालेली प्रत ही सर्वप्रथम .io डोमेन एक्सटेंशनवर अपलोड करण्यात आली होती. हा ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीशी संबंधित कंट्री कोड डोमेन आहे. त्यानंतर हे पुस्तक इतर होस्टिंग प्लॅटफॉर्मवरही अपलोड केले गेले.

स्पेशल सेल आता या पुस्तकाच्या आयएसबीएन क्रमांकाचाही तपास करत आहे. आयएसबीएन म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. हा १३ आकड्यांचा एक यूनिक डिजिटल कोड असतो. लीक झालेल्या आवृत्तीमध्ये जो आयएसबीएन क्रमांक मिळाला तो फोर स्टार ऑफ डेस्टिनी या नावाने प्रकाशित झालेल्या मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या कोडबाबत पेंग्विन इंडियाचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये ऑनलाईन विक्री करत असलेल्या संकेतस्थळांवर जो आयएसबीएन कोड सापडला आहे तोसुद्दा पेंग्विन इंडियाकडून प्रसिद्ध झालेल्या याच पुस्तकाशी संबंधित असल्याचं दिसून आलं आहे.  

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारindia china faceoffभारत-चीन तणाव