शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 21:25 IST2025-05-25T21:24:00+5:302025-05-25T21:25:05+5:30
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमधील पाइपलाइनमधून अचानक फॉर्मेलिन गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णालयात खळबळ उडाली.

शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमधील पाइपलाइनमधून अचानक फॉर्मेलिन गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णालयात खळबळ उडाली. यामुळे रुग्णालयात असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी चेंगराचेंगरी झाली. घाईघाईत, ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले. या काळात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजताच्या घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजमधील पाइपलाइनमधून फॉर्मेलिन गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर, या दुर्गंधीमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली, पण तोपर्यंत रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली होती. सर्व सेवक त्यांच्या रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढून पळून जाऊ लागले. ट्रॉमा सेंटरमधून सुमारे २० रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. गॅस गळतीनंतर रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती फार ब्रिगेडला दिली.
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने रुग्णालयात पाणी फवारले. सुमारे दीड तासानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील परिस्थिती सामान्य झाली. या काळात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीमुळे त्यांच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डीएम आणि प्राचार्य यांनी कोणत्याही मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. चेंगराचेंगरीमुळे ज्या रुग्णाचा मृत्यू झाला असे म्हटले जाते त्याचे फुफ्फुस आधीच खराब झाले होते असे डीएम यांनी सांगितले.