आता कार्ड विसरा, अंगठीद्वारे पेमेंट करा, भारतीय कंपनीने लाँच केली पेमेंट रिंग, अशी आहेत वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:20 IST2023-11-09T15:18:54+5:302023-11-09T15:20:25+5:30
Payment: खिशात रोख रक्कम नसली तरी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे झटपट पेमेंट करण्याचा पर्याय लोकप्रिय झालेला आहे. आता एक खास प्रकारची रिंगही विकसित झाली आहे. तिच्या माध्यमातून तुम्ही कुठलंही पेमेंट करू शकता.

आता कार्ड विसरा, अंगठीद्वारे पेमेंट करा, भारतीय कंपनीने लाँच केली पेमेंट रिंग, अशी आहेत वैशिष्ट्ये
खिशात रोख रक्कम नसली तरी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे झटपट पेमेंट करण्याचा पर्याय लोकप्रिय झालेला आहे. आता एक खास प्रकारची रिंगही विकसित झाली आहे. तिच्या माध्यमातून तुम्ही कुठलंही पेमेंट करू शकता. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या पाहिल्या असतील. मात्र कुठलीही बॅटरी नसलेली स्मार्ट रिंग तुम्ही क्वचितच पाहिली असेल. एका स्टार्टअपने काँन्टॅक्टलेस पेमेंटवाली रिंग लाँच केली आहे. या रिंगचं नाव 7 Ring असं आहे. ही रिंग कंपनीने सप्टेंबर महिन्यात Fintech Fest 2023 मध्ये शोकेस केलं होतं.
ही खास प्रकारची अंगठी भारतीय ब्रँड ७ ने एनपीसीआयसोबत मिळून डेव्हलप केली आहे. हे डिव्हाईस एनएफसीवर काम करते. या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही पाहिला असेल. अनेक दुकानांवर तुम्ही टॅप अँड पे मेथडचा वापर केला असेलच. हे फिचर अनेक क्रेडिट कार्ड्स, सॅमसंग पे, अॅपल पेसोबत मिळतं. आता ही रिंग विकसित करणाऱ्या कंपनीने सांगितले की, ही रिंगसुद्धा त्याच तंत्रज्ञानावर काम करते. मात्र या रिंगचं सिक्युरिटी फिचर अधिक चांगलं आहे.
कंपनीने ही रिंग भारतामध्ये ७ हजार रुपये किमतीवर लाँच केली आहे. मात्र अर्ली बर्ड ऑफरअंतर्गत कंपनी ही रिंग ४,७७७ रुपयांना विकत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. युझर्स हे डिव्हाईस ईएमआयवरही खरेदी करू शकतात. 7 Ring ८२९ रुपयांच्या सहा महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करता येऊ शकता.
या किमतीवर खरेदी केलेल्या रिंगसाठी कंपनी ५५ महिन्यांची व्हॅलिडिटी आणि १ वर्षाची वॉरंटी देत आहे. मात्र ही रिंग सध्या सर्व युझर्सना उपलब्ध नाही आहे. सध्या इन्व्हाइट कोड मिळालेल्या युझर्सनाच ही रिंग खरेदी करता येणार आहे.