शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

परदेशी विद्यापीठांमुळे देशात शिक्षण परवडेनासे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 06:36 IST

प्रा. भूषण पटवर्धन यांचे मत उच्चशिक्षणातील बदल स्वागतार्ह; धोरणकर्त्यांना दिला सावधगिरीचा इशारा

टेकचंद सोनवणे।नवी दिल्ली: परदेशी विद्यापीठांना भारतात आणण्याचा विचार चांगला असला तरी त्यात विद्यार्थी हिताचा विचार हवा. अन्यथा देशात वर्गसंघर्ष आणि सामान्यांना शिक्षण न परवडण्याचा धोका वाढेल. इथे परदेशी विद्यापीठांची बेटे तयार होतील. शिवाय जागतिक दर्जाची किती विद्यापीठे भारतात येतील, हा प्रश्न आहेच. सध्या बाजारू विद्यापीठे येण्याची भीती अधिक आहे, अशा शब्दात विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना नव्या धोरणकर्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.प्रश्न - या स्थितीत परदेशी विद्यापीठांना काय पर्याय आहे?परदेशी विद्यापीठांमुळे सर्वांना शिक्षण परवडणे अवघड होईल. त्यातून समस्या वाढतील. विद्यार्थी हिताचा विचार व्हायला हवा. प्रतिष्ठित विद्यापीठे येण्यास अनुत्सुक असतील, तर बाजारू विद्यापीठे याचा फायदा उठवतील. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलामध्ये जगभरातून विद्यार्थी येत. तशी व्यवस्था पुन्हा उभी करण्याचा विचार व्हायला हवा.प्रश्न - जागतिक क्रमवारीतआपण मागे आहोत?कोण ठरवते क्रमवारी? शिक्षण गुणवत्तेचे सर्वमान्य निकष आहेत. अमेरिका-युरोपमध्ये ते काही वेगळे नाही. येथील शिक्षण जागतिक दर्जाचे व्हायला हवे. जागतिक क्रमवारीचे क्रमवारीचे मार्केर्टिंंग कुणी केले? त्यावर अमेरिका-चीनच्या सिस्टमचा प्रभाव आहे. भारताला हिणवणे सुरू झाले. आपल्यावरही दबाव वाढला. त्यामुळे नवी योजना तयार झाली. गुणवत्तावाढीऐवजी रॅट रेसमध्ये सामील झाले. त्यातून दिखाऊपणा वाढला. सरकारी मदत विद्यापीठांना दिली गेली. पण आपल्या समस्या सोडवण्यास विद्यापीठे सक्षम झाली का?प्रश्न- नव्या शैक्षणिक धोरणात सरकारनेकेलेल्या तरतुदींबाबत काय मत आहे?उच्च शिक्षणातबदल, प्रस्तावितमल्टिसेंट्रीक शिक्षणामुळे आपले ध्येय साधता येईल. रँकिंग रेसऐवजी देशांची गरज औळखून आपली विद्यापीठे उभी राहिली पाहिजे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती प्रश्न कळतो? खरीप-रब्बीमधील फरक सांगता येतो? कोणतीही विद्याशाखा देशाची गरज व समस्या सोडवणारी हवी. प्रस्तावित बहुशाखा अभ्यासामुळे हा बदल होण्याची आशा आहे.प्रश्न - आपल्याकडे संशोधनाविषयीकमालीची उदासीनता दिसून येते?कारण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये विद्याथीतयार होत नाही. पदवी घेतल्याने नोकरी मिळणार नाही हे माहित असल्याने विद्यार्थी पदवुत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतो. त्यातूनच पुढे पीएचडी केली जाते. फेलोशिप मिळते. जगात सर्वाधिक संख्येने भारतात शिष्यवृत्ती दिली जाते, पण संशोधनात आपण खूप मागे आहोत. कारण विद्यार्थ्यांची क्षमता, गरज, आवड घेऊन शैक्षणिक प्रगतीचा कधीही विचार झाला नाही. प्रस्तावित राष्ट्रीय संशोधन परिषदेने याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण