शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पंजाबपाठोपाठ आता छत्तीसगड काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ११ आमदार दिल्लीला रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 4:38 PM

Congress News: नेतृत्वात बदल केल्यानंतरही पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादविवादांमुळे पक्षामध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. त्या आता अजून एका राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

रांची - नेतृत्वात बदल केल्यानंतरही पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादविवादांमुळे पक्षामध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. त्या आता अजून एका राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पंजाबपाठोपाठ आता छत्तीसगडमध्ये राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील काँग्रेसचे अकरा आमदार आज अचानक दिल्लीकडे रवाना झाले. हे आमदार दिल्लीमध्ये हायकमांडचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Following Punjab, now there is a big development in Chhattisgarh Congress, seven MLAs left for Delhi)

या आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकारण तापले आहे. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते याबाबत काहीही बोलणे टाळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे समर्थक असलेले हे आमदार वेगवेगळ्या विमानांमधून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीमधून शिमला येथे जाणार आहेत. तसेच तिथे एकत्र सुट्टी घालवतील, असे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला सात आमदार दिल्लीला गेल्याचे वृत्त आले होते. मात्र नंतर यामध्ये चार अजून अमदारांच्या नावांचा समावेश झाला. मात्र या मुद्द्यावरून आता काँग्रेसमध्ये राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे.

दिल्लीकडे रवाना झालेल्या काँग्रेस आमदारांपैकी केवळ सर यू.डी. मिंज, राजकुमार यादव आणि विकास उपाध्याय यांची नावेच समोर आली आहेत. छत्तीसगडमधील अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युल्यावरून उठलेले राजकीय वादळ शांत झाले असे वाटत असतानाच आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसChhattisgarhछत्तीसगड