शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:50 IST

Asia First Hybrid Flying Car: चेन्नईतील कंपनीने तयार केलेलं हे मॉडेल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सादर केलं आहे.

नवी दिल्ली: सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या जाममुळे दररोज आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक वेळा ऑफिससह अनेक महत्वाच्या कामांसाठी वेळेवर पोहोचण्यास उशीर होतो. पण, आता लवकरच या समस्येतून सुटका होऊ शकते. देशात पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल तयार झाले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली माहिती

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.

या कामांसाठी केला जाऊ शकतो वापर

ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करत म्हटले की, हायब्रीड फ्लाइंग कारचा वापर माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जाईल. तसेच, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात याची खूप मदत होऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राणही याद्वारे वाचू शकतात.

कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससह डिजीटल इंस्ट्रूमेंटविनता एअरोमोबिलिटीने तयार केलेलं हे मॉडेल 5 ऑक्टोबरला लंडनमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक प्रदर्शनात सादर केलं जाईल. विनता एअरोमोबिलिटीचा दावा आहे की, या हायब्रीड फ्लाइंग कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससह डिजीटल इंस्ट्रूमेंट पॅनलदेखील असेल. 

1300 किलो वजन उचलण्याची क्षमताया हायब्रीड फ्लाइंग कारचं वजन 1100 किलोग्राम असेल आणि तर 1300 किलो वजन उचलण्याची क्षमता या कारची असेल. विनता एअरोमोबिलिटीच्या फ्लाइंग कारला दोन प्रवाशांसाठी तयार केलं असून, 100-120 किलोमीटर प्रती तासांच्या वेगानं ही कार उडू शकेल. याशिवाय, कंपनीनं जास्तीत-जास्त उडण्याची वेळ 60 मिनीट आणि उंची 3000 फूट असेल, असा दावा केला आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcarकारChennaiचेन्नईauto expoऑटो एक्स्पो 2020Automobileवाहन