शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग २)

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

जुगलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त्यात अद्वैत साधण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. कुणीही कुणावरही आतापर्यंत हावी झाले नाही. असे होत असेल तर ती जुगलबंदी नाही. बासरीकडे खूप लोक वळतात आणि त्यात परिश्रम असल्याचे कळल्यावर इतर वाद्यांकडे वळतात. कारण त्यात ध्वनी काढण्यासाठी प्रयत्न करायचा नसतो. बासरीत मात्र प्रथम स्वरांची निर्मिती आणि त्यानंतर साधना असल्यामुळे झटपट प्रसिद्धी हवी असणारे लोक बासरीकडे वळत नाहीत. पण ज्याने ही साधना केली तो रसिकप्रिय होतो. पण बासरीच्या स्वरांची मोहिनी आता जगभरात आहे. प्रथम लोक गिटार शिकत होते आता बासरी

जुगलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त्यात अद्वैत साधण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. कुणीही कुणावरही आतापर्यंत हावी झाले नाही. असे होत असेल तर ती जुगलबंदी नाही. बासरीकडे खूप लोक वळतात आणि त्यात परिश्रम असल्याचे कळल्यावर इतर वाद्यांकडे वळतात. कारण त्यात ध्वनी काढण्यासाठी प्रयत्न करायचा नसतो. बासरीत मात्र प्रथम स्वरांची निर्मिती आणि त्यानंतर साधना असल्यामुळे झटपट प्रसिद्धी हवी असणारे लोक बासरीकडे वळत नाहीत. पण ज्याने ही साधना केली तो रसिकप्रिय होतो. पण बासरीच्या स्वरांची मोहिनी आता जगभरात आहे. प्रथम लोक गिटार शिकत होते आता बासरी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काका पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सानिध्यात राहताना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बासरीशी खेळ सुरू झाला आणि ज्या वेळी कळायला लागले तेव्हा मी हादरलो. काकांनी बासरीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी जे परिश्रम केले ते मलाही करावे लागतीलच, याचा धसका घेतला पण बासरी सोडणे शक्यच नव्हते. पं. हरिप्रसादजींच्या आशीवार्दाने मी ही साधना केली आणि अजूनही करतो आहे. पं. हरिप्रसाद यांनी बासरीला ज्या उंचीवर नेले त्या उंचीवर जाण्याची माझी शक्ती नाही पण किमान ती परंपरा समोर जपण्याचा माझा प्रयत्न आहे. आजही पं. हरिप्रसादजी सहा ते सात तासांचा रियाज करतात. त्यामुळे रियाज करावाच लागतो. मात्र काकांनी मला कधीही बासरीवादक होण्यासाठी दबाव टाकला नाही. पण बासरी हातात पकडल्यावर मात्र त्यांनीच मला शिकविले, असे ते म्हणाले.
-------------------
फ्युजन आनंददायी
फ्युजन हा प्रकार आनंददायी आहे. दोन वेगवेगल्या संगीत प्रकारांचे फ्युजन नेहमीच वेगळे संगीत निर्माण करते आणि फ्युजनमधून संगीत समृद्धच होते. पण फ्युजन करताना दोन्ही संगीताचे शास्त्र नियम पाळून करायला हवे. सध्या विदेशात वेगवेगळ्या संगीत प्रकारांसह आणि अनेक वाद्यांसह आम्ही फ्युजन करतो आणि रसिकांना ते आवडते. फ्युजनमध्येही सोल असतो. पण मूळ नैसर्गिक वाद्यांना इलेक्ट्रीकची साथ दिली तर त्यातले माधुर्य संपते, असे ते म्हणाले.