बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग २)
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:24+5:302015-02-14T23:52:24+5:30
जुगलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त्यात अद्वैत साधण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. कुणीही कुणावरही आतापर्यंत हावी झाले नाही. असे होत असेल तर ती जुगलबंदी नाही. बासरीकडे खूप लोक वळतात आणि त्यात परिश्रम असल्याचे कळल्यावर इतर वाद्यांकडे वळतात. कारण त्यात ध्वनी काढण्यासाठी प्रयत्न करायचा नसतो. बासरीत मात्र प्रथम स्वरांची निर्मिती आणि त्यानंतर साधना असल्यामुळे झटपट प्रसिद्धी हवी असणारे लोक बासरीकडे वळत नाहीत. पण ज्याने ही साधना केली तो रसिकप्रिय होतो. पण बासरीच्या स्वरांची मोहिनी आता जगभरात आहे. प्रथम लोक गिटार शिकत होते आता बासरी

बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग २)
ज गलबंदी असो वा फ्युजन, बासरीचे स्वर मोहात पाडतात. जुगलबंदी म्हणजे स्वरांचे युद्ध नसून दोन कलावंतांचे अद्वैत साधण्याचा हा प्रयत्न आहे. यातून दोन वाद्यांचाही समन्वय होतो आणि आनंदाची निर्मिती होते. आपल्या अनेक दिग्गज कलावंतांनी जुगलबंदी सादर केली पण त्यात अद्वैत साधण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. कुणीही कुणावरही आतापर्यंत हावी झाले नाही. असे होत असेल तर ती जुगलबंदी नाही. बासरीकडे खूप लोक वळतात आणि त्यात परिश्रम असल्याचे कळल्यावर इतर वाद्यांकडे वळतात. कारण त्यात ध्वनी काढण्यासाठी प्रयत्न करायचा नसतो. बासरीत मात्र प्रथम स्वरांची निर्मिती आणि त्यानंतर साधना असल्यामुळे झटपट प्रसिद्धी हवी असणारे लोक बासरीकडे वळत नाहीत. पण ज्याने ही साधना केली तो रसिकप्रिय होतो. पण बासरीच्या स्वरांची मोहिनी आता जगभरात आहे. प्रथम लोक गिटार शिकत होते आता बासरी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काका पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सानिध्यात राहताना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बासरीशी खेळ सुरू झाला आणि ज्या वेळी कळायला लागले तेव्हा मी हादरलो. काकांनी बासरीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी जे परिश्रम केले ते मलाही करावे लागतीलच, याचा धसका घेतला पण बासरी सोडणे शक्यच नव्हते. पं. हरिप्रसादजींच्या आशीवार्दाने मी ही साधना केली आणि अजूनही करतो आहे. पं. हरिप्रसाद यांनी बासरीला ज्या उंचीवर नेले त्या उंचीवर जाण्याची माझी शक्ती नाही पण किमान ती परंपरा समोर जपण्याचा माझा प्रयत्न आहे. आजही पं. हरिप्रसादजी सहा ते सात तासांचा रियाज करतात. त्यामुळे रियाज करावाच लागतो. मात्र काकांनी मला कधीही बासरीवादक होण्यासाठी दबाव टाकला नाही. पण बासरी हातात पकडल्यावर मात्र त्यांनीच मला शिकविले, असे ते म्हणाले. -------------------फ्युजन आनंददायीफ्युजन हा प्रकार आनंददायी आहे. दोन वेगवेगल्या संगीत प्रकारांचे फ्युजन नेहमीच वेगळे संगीत निर्माण करते आणि फ्युजनमधून संगीत समृद्धच होते. पण फ्युजन करताना दोन्ही संगीताचे शास्त्र नियम पाळून करायला हवे. सध्या विदेशात वेगवेगळ्या संगीत प्रकारांसह आणि अनेक वाद्यांसह आम्ही फ्युजन करतो आणि रसिकांना ते आवडते. फ्युजनमध्येही सोल असतो. पण मूळ नैसर्गिक वाद्यांना इलेक्ट्रीकची साथ दिली तर त्यातले माधुर्य संपते, असे ते म्हणाले.