विमानाच्या टायरमधील हवा निघाल्याने घबराट
By Admin | Updated: January 6, 2016 23:55 IST2016-01-06T23:55:12+5:302016-01-06T23:55:12+5:30
एअर इंडियाच्या दिल्ली-भोपाळ-दिल्ली विमानातील प्रवासी बुधवारी थोडक्यात बचावले. विमान येथील राजभोज विमानतळावर उतरल्यानंतर

विमानाच्या टायरमधील हवा निघाल्याने घबराट
भोपाळ : एअर इंडियाच्या दिल्ली-भोपाळ-दिल्ली विमानातील प्रवासी बुधवारी थोडक्यात बचावले. विमान येथील राजभोज विमानतळावर उतरल्यानंतर अचानक त्याच्या टायरमधील हवा निघाली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. सर्व ९५ प्रवासी सुखरूप आहेत.
एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक पी. कुजूर यांनी ही माहिती दिली. दिल्लीवरून निघालेले एआय ३२० हे विमान सकाळी भोपाळच्या विमानतळावर उतरले. मात्र उतरताक्षणीच त्याच्या एका टायरमधील हवेचा दाब अचानक कमी झालेला आढळला. हे विमान अर्ध्या तासानंतर भोपाळवरून पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार होते. टायरमधील हवा कमी झाल्याने त्याचे वेळापत्रक कोलमडले. (वृत्तसंस्था)