शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडग्रस्त गावांतील लोकांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलशुद्धीकरण यंत्रे लावणारनागपूर : जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त व पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी २३ गावांची निवड करण्यात आली आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने लोकांना गंभीर आजारांना सामोरे जावे ...


पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : जलशुद्धीकरण यंत्रे लावणार
नागपूर : जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त व पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या गावांतील लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी २३ गावांची निवड करण्यात आली आहे.
फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने लोकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. हाडाचे व दातांचे आजार होतात. अशा रुग्णांना अकाली वृद्धत्व येते, परंतु पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील २३ गावांतील लोकांना या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या गुणवत्ता सल्लागार राधा रहांगडाले व अनिल राजदार यांनी ८००० पाणी नमुने गोळा केले. प्रयोगशाळेत तपासणी केली असता यातील ९८५ प्रदूषित आढळून आलेले आहेत. यात २३ गावांतील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक आहे. या गावांना पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रे दिली जाणार आहेत. यात हिंगणा तालुक्यातील ८, भिवापूर ३, कामठी, नागपूर ग्रामीण व पारशिवनी तालुक्यातील प्रत्येकी १, उमरेड ३ तर रामटेक तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे(प्रतिनिधी).
चौकट...
उन्हाळ्यात अधिक प्रमाण
फ्लोराईडग्रस्त गावातील भूगर्भातील पाण्यात पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात फ्लोराईडयुक्त पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्याआधी व पावसाळ्यात असे दोनवेळा तपासणीसाठी नमुने घेतले जातात.
चौकट..
जलशुद्धीकरण यंत्रे लावणार
जिल्ह्यातील फ्लोराईडग्रस्त २३ गावांत जलशुद्धीकरण यंत्रे लावली जाणार आहेत. बांध वा अन्य उपाययोजना करून पावसाचे पाणी अडवल्यास भूगर्भातील पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी होते. अशा पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी केले आहे.