शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांपासून भाजपच्या तिजोरीत देणग्यांचा ओघ; भाजप ७८५ कोटी, काँग्रेस १३९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:54 IST

BJP : केंद्र आणि अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१७.७५ कोटी रुपये मिळाले.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली :  सलग सात वर्षांपासून देणग्यांच्या वाढत्या ओघाने भाजपची तिजोरी ओसंडत आहे.  २०१९-२० मध्ये भाजपला ७८५ कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी अधिक रक्कम निवडणूक विश्वस्त कंपन्यांमार्फत (इलेक्टोरल ट्रस्ट) मिळाल्या. भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्यांत महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

केंद्र आणि अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१७.७५ कोटी रुपये मिळाले. आयटीसीकडून ७६ कोटी, मुंबईच्या जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४६ कोटी आणि न्यू डेमॉक्रॅटिक इलेक्टोरल ट्रस्टकडून ३० कोटी रुपयांची देणगी मिळाली.  याशिवाय भाजपचे खासदार राजीव चंद्रेशखर यांच्या ज्युपिटर कॅपिटलने पक्षाला १५ कोटी रुपयांची देणगी दिली. भाजपला देणग्या देण्यात शैक्षिणक संस्थाही मागे नाहीत.  अशा १४ संस्था आणि विद्यापीठांची नावे यादीत समाविष्ट आहेत. दिल्लीच्या मेवाड विद्यापीठाने २ कोटी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगने १० लाख, सुरतच्या जी. डी. गोयंका इंटरनॅशलन स्कूलने २.५ लाख, रोहतकच्या पठानिया पब्लिक स्कूलने २.५ लाख आणि कोटा येथील एका कोचिंग सेंटरने २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. राज्यसभेतील भाजपचे सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी २ कोटी, खासदार किरण खेर यांनी ६.८ लाख रुपये आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ५ लाख रुपये दिले. 

कोणत्या पक्षाला किती देणगी?-    महाराष्ट्रातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील  शिवसेनेला १८.६१ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसला १३९ कोटी रुपयांची देणगी मिळाली.-    बहुजन समाज पार्टीने निवडणूक दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, पक्षाला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेत देणगी मिळालेली नाही.

टॅग्स :MONEYपैसाcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना