म्यानमारमधील पुराचा १ लाख लोकांना फटका
By Admin | Updated: August 2, 2015 22:26 IST2015-08-02T22:26:00+5:302015-08-02T22:26:00+5:30
म्यानमारमधील पुराने २७ जणांचा बळी घेतला असून, या भीषण पुराचा फटका १,१४,८४५ लोकांना बसला आहे. जुलै महिन्यात झालेल्या

म्यानमारमधील पुराचा १ लाख लोकांना फटका
याँगॉन : म्यानमारमधील पुराने २७ जणांचा बळी घेतला असून, या भीषण पुराचा फटका १,१४,८४५ लोकांना बसला आहे. जुलै महिन्यात झालेल्या जबरदस्त पावसामुळे १२ प्रांतांत व ४२ गावांत पूरस्थिती आहे.
पाऊस व पुरामुळे घरे व कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. म्यानमारच्या अयवादी, चिंदविन, थानलीन , सितुंग, नागॉन या नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मदत संघटना व एनजीओ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. (वृत्तसंस्था)