शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 4:06 AM

केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे.

तिरुवनंतपुरम/बंगळुरू : केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. केरळ, कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढून १२३ झाली आहे, तर ६ लाख लोकांनी मदत शिबिरात आश्रय घेतलेला आहे.केरळात ५८ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. यातील ५० लोक मलप्पुरमचे आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांंधी हे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमध्ये आलेले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी वायनाडच्या तिरुवम्बाडीमध्ये एका शिबिरात पाहणी केली. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत. पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस आणि यूडीएफच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आज सण असूनही आनंदाचे वातावरण नाही. तरीही मी आपणास ईदच्या शुभेच्छा देतो.मध्य भारत, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशाराबंगालच्या उत्तर पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे मध्य भारतात आणि केरळच्या काही भागांत आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.राहुल गांधी यांचे मदत साहित्य देण्याचे आवाहन

वायनाड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी नागरिकांना आवाहन केले की, वायनाडमधील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत करावी. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून, यात म्हटले आहे की, वायनाडमध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांना शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना तात्काळ पाणी बॉटल, चटई, चादरी, कपडे, चप्पल, साबण, टूथब्रश, ब्लिचिंग पावडर आदींची गरज आहे. लोकांनी बिस्किट, साखर, मूग डाळ, हरभरा डाळ, नारळाचे तेल, भाज्या, ब्रेड आणि मुलांसाठी खाण्याचे पदार्थ द्यावेत, असे आवाहन केले आहे.मृत्यूनंतरही त्यांचे हातात घट्ट होते हातमलप्पुरम : आई आपल्या मुलावर किती प्रेम करते? त्याच्यासाठी ती काय काय नाही करीत? पण, जेव्हा मृत्यू समोर दिसू लागला आणि त्यातून सुटका होण्याची शक्यताही धूसर झाली तेव्हा या माऊलीने आपल्या दीड वर्षाच्या लेकराचा हात हातात घट्ट धरला.कदाचित काळाच्या तावडीतून हा कोवळा जीव तरी वाचावा हीच तिची अपेक्षा असेल; पण नियतीला काही वेगळंच करायचं होतं... मलप्पुरममध्ये मदतकार्यात भूस्खलनाच्या ठिकाणाहून गीतू (२१) या महिलेचा आणि तिच्या दीड वर्षाच्या धु्रव या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मातेने आपल्या चिमुरड्याचा हात हातात घट्ट पकडला होता.अगदी मृत्यूनंतरही हाताची ही पकड तशीच होती. स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.या दुर्घटनेत महिलेचा पती सरत बचावला आहे; पण यात आईचाही मृत्यू झाला आहे. पत्नी, मुलगा आणि आईच्या जाण्याने सरत यांना मोठा धक्का बसला आहे.

कर्नाटकमध्ये 40 जणांचा बळी कर्नाटकात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४० वर पोहोचली असून, १४ नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत पुरात फसलेल्या ५ लाख ८१ हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, तर ११६८ शिबिरांत ३,२७,३५४ लोकांनी आश्रय घेतला आहे. राज्यात मदतकार्य वेगाने सुरू असून, पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागले आहे. ४ ते ५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले, तर केंद्राकडून 3000 कोटी रुपयांची तात्काळ मदत राज्य सरकारने मागितली.माय-लेकीसह भूस्खलनात सहा जण ठारडेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत मुसळधार पावसानंतरच्या भूस्खलन आणि पुराच्या दुर्घटनेत माय-लेकीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तीन लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. चमोली जिल्ह्यात पहाडी भागात सोमवारी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात रूपा देवी आणि त्यांची ९ महिन्यांची मुलगी चंदा दबल्या गेल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घरातील ४० शेळ्या आणि दोन बैलही ढिगाºयाखाली दबले असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :floodपूरKeralaकेरळKarnatakकर्नाटक