Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 08:13 IST2022-08-07T08:06:14+5:302022-08-07T08:13:07+5:30
पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो.

Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून
पठाणकोट - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा प्रमुख रस्ता नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे, येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. येथील चक्की नदीला पूर आल्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान आणि तीव्र होता. या प्रवाहात विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. यासंदर्भात पठाणकोटचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी हिमाचल सरकारला अवगत केलं आहे. तसेच, लवकरात लवकर हा मार्ग बनवून घेण्याची विनंतीही केली आहे.
पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळे, या वाहून गेलेल्या रस्त्यासंदर्भात आणि हिमाचल सरकारला माहिती दिली आहे. तसेच, या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचेही सूचवले आहे. त्यानंतर, हिमाचल प्रदेश सरकारने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्याचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी सांगितले.
Punjab: Road leading to Pathankot airport washed away due to increased water flow in Chakki river
— ANI (@ANI) August 7, 2022
The area comes under Himachal Pradesh govt and we have taken up the matter with them and they are working on it: Harbir Singh, Deputy Commissioner, Pathankot (06.08) pic.twitter.com/UgnvKZpoiR
एअरपोर्टकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील काही गावांचा संपर्कही तुटला आहे. तसेच, सैन्यातील जवानांची, अधिकाऱ्यांची आणि नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यापासून हा रस्ता खचला होता, तर काही भाग गेल्या महिन्यातच वाहून गेला होता. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या ह्या रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.