देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:26 IST2025-11-07T20:09:19+5:302025-11-07T20:26:10+5:30
दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. जवळपास १,००० उड्डाणांना उशिर झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
देशातील सर्वात मोठे विमानतळ असलेले दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडाचा १ हराज हून अधिक विमानांना फटका बसला आहे. या बिघाडामुळे सुरुवातीला दिल्लीहून निघणाऱ्या विमानांना फटका बसला, पण नंतर त्याचा परिणाम देशभरातील इतर विमानतळांवर होऊ लागला.
एकट्या दिल्लीत, सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आयजीआय विमानतळावरून सुमारे १,००० विमानांना विलंब झाला. विमानांना सरासरी एक तासाचा विलंब होता. अनेक विमाने दोन ते तीन तासांच्या विलंबाने निघाली लँडिंगलाही तेवढाच उशीर झाला. प्रभावित झालेल्या विमानांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या उड्डाणांचा समावेश होता.
सुरुवातीला उड्डाणांवर परिणाम, नंतर लँडिंगवरही याचा परिणाम
सकाळी ६ वाजेपर्यंत उड्डाणे कमी-अधिक प्रमाणात सामान्य राहिली, पण रात्री उशिरापासून प्रस्थानांवर परिणाम होऊ लागला. रात्री अर्धा तास ते तीन तासांच्या विलंबामुळे प्रवाशांना कोणतीही मोठी गैरसोय झाली नाही. .
सकाळी ६ वाजल्यानंतर, अगदी एक तासाचा विलंब सामान्य झाला. दरम्यान, सकाळी १० वाजल्यानंतर लँडिंग आणि उड्डांण दोन्हीवर समान प्रमाणात विलंब होऊ लागला. दुपारी २ वाजल्यानंतर, आगमन आणि प्रस्थान दोन्हीवर समान परिणाम झाला.
तांत्रिक बिघाड कसा सुरू झाला?
ही समस्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एएमएसएस) (ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम) मध्ये बिघाडामुळे सुरू झाली. एएमएसएस ही एअर ट्रॅफिक कंट्रोल, फ्लाइट प्लॅन, हवामान माहिती आणि मार्ग व्यवस्थापित करण्यासाठी मध्यवर्ती प्रणाली आहे. या बिघाडामुळे ऑटोमॅटिक फ्लाइट प्लॅन ट्रान्समिशनमध्ये व्यत्यय आला, यामुळे नियंत्रकांना प्रत्येक तपशील मॅन्युअली टाकावा लागला.
एएमएसएसमधील बिघाड गुरुवारी रात्री दिसला. तांत्रिक पथकांनी लगेचच तो दुरुस्त करण्यासाठी काम सुरू केले. सकाळपर्यंत, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि सिस्टम पूर्णपणे बंद झाली. अशा बिघाड जुन्या सिस्टममध्ये अपग्रेड नसल्यामुळे होऊ शकतात, असे मत तज्ञांचे आहे.