शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर - आंदोलनावेळी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्यास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:28 IST

जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये अनेकदा हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं जातं. मात्र आता अशाप्रकारे संपत्तीचं नुकसान करणा-या आंदोलकांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.  आंदोलकांकडून फक्त दंड आकारला जाणार नाही, तर त्यांना जवळपास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. 

जम्मू अॅण्ड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज) ऑर्डिनन्स 2017 अंतर्गत, सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानाशी संबंधित अस्तित्वात असलेल्या कायद्यात काही बदल केले जाणार आहेत, आणि त्यानंतर हा अध्यादेश तात्काळपणे लागू करण्यात येईल. 'यामुळे व्यक्ती तसंच संघटनांच्या सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचवण्याच्या भूमिकेला आळा बसेल', असं एका अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आलं आहे. 

हा अध्यादेश आणण्यामागे दोन उद्देश आहेत. पहिला उद्धेश म्हणजे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीला नुकसान पोहोचवणं दंडनीय गुन्हा असेल, आणि दुसरा म्हणजे असे गुन्हे करणा-यांना थेट जबाबदार ठरवण्यास मदत मिळेल. बंद, उपोषण, निदर्शन तसंच इतर प्रकारच्या आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचं नुकसान झालं तर बंद किंवा आंदोलनासाठी उकसवणा-यांना दोन ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय त्यांना बाजारमूल्याप्रमाणे नुकसान झालेल्या संपत्तीची दंड म्हणून भरपाई द्यावी लागणार आहे. 

याआधी खासगी संपत्तीचं नुकसान झाल्यास कारवाई करण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. मात्र या अध्यादेशात ही तरतूद करण्यात आली आहे. याआधी फक्त सरकारी संपत्तीचं नुकसान झाल्यावरच कारवाई केली जात होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी कायद्यात सुधार करण्याचा हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. सध्या विधानसभेचं कोणतंही अधिवेशन सुरु नसल्याने मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शिफाशीनंतर राज्यपालांनी हा अध्यादेश लागू केला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती