गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग, पाच जणांचा मृत्यू; तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 08:29 AM2020-11-27T08:29:28+5:302020-11-27T08:29:49+5:30

fire broke out at Shivanand COVID Hospital: गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती.

Five people died after a fire broke out at Shivanand COVID Hospital; third incident | गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग, पाच जणांचा मृत्यू; तिसरी घटना

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग, पाच जणांचा मृत्यू; तिसरी घटना

Next

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेल्या कोविड रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्या रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली आहे. आजच्या या आगीत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटललाआग लागल्यानंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या 35 रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटमध्ये अचानक आग लागली होती.


 यानंतर ८ सप्टेंबरला गुजरातच्या बडोदा शहरातील कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूला भीषण आग लागली आहे. या हॉस्पिटमध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत होते. सयाजीराव जनरल हॉस्पिटलमध्ये ही आग लागली होती. सयाजीराव जनरल हॉस्पिटलमध्ये ही आग लागली होती. 




यानंतर आजची ही तिसरी घटना आहे. राजकोटच्या शिवानंद कोविड हॉस्पिटलला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
 

Web Title: Five people died after a fire broke out at Shivanand COVID Hospital; third incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.