शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

देशात पोलीस कोठडीत रोज 5 जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 05:55 IST

आठ वर्षांत १३,७१० पेक्षा जास्त जणांनी गमावले प्राण

 नितिन अग्रवाल नवी दिल्ली : पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांपैकी रोज सरासरी पाच जणांचा मृत्यू होत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडील (एनएचआरसी) ताज्या आकडेवारीनुसार गेल्या आठ वर्षांत पोलिसांच्या ताब्यात १३ हजार ७१० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत. पोलीस कोठडीत आरोपीकडून गुन्हा कबूल करून घेणे व पुरावे गोळा करण्यासाठी छळ सामान्य बाब आहे. गेल्या दहा वर्षांत १४६४ जणांचे मृत्यू पोलीस कोठडीत झाले आहेत. मानवाधिकार आयोगाच्या निर्देर्शांनुसार पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्याची माहिती २४ तासांत द्यावी लागते. तसे न होता ते प्रकरण दाबून टाकण्याचे प्रयत्न होतात.

अशा प्रकरणांत प्रथम माहिती अहवाल व घटनेनंतर दोन महिन्यांत त्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करणेही गरजेचे असते. मानवाधिकारांसाठी काम करणारे व छळाविरोधात आंतरराष्ट्रीय अशासकीय संघटना ‘नॅशनल कॅम्पेन अगेन्स्ट टॉर्चरचे’ सुहास चकमा यांच्या माहितीनुसार अशा घटनांत नेहमीच नियमांचे पालन कमी होते. मानवाधिकार आयोगाकडे तर पोलीस कोठडीबाहेर झालेल्या मृत्युची प्रकरणे पोहोचतच नाहीत.मानवाधिकार आयोग तथा गुन्हा तथा तुरुंगातील वार्षिक आकडेवारी जाहीर करणारा गृहमंत्रालयाचा विभाग राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोकडील आकडेवारीत फार अंतर असते. एनसीआरबीकडील आकडेवारीत २०१९ मध्ये पोलीस कोठडीत ८५, २०१८ मध्ये ७० जणांचा मृत्यू झाला होता तर मानवाधिकार आयोगाकडील याच वर्षांच्या माहितीनुसार मृत्यू झाल्याच्या अनुक्रमे १२५ व १३० पेक्षा जास्त तक्रारी आल्या होत्या.  मानवाधिकार आयोगाच्या एका सदस्यानुसार पोलीस कोठडीत मृत्युची माहिती २४ तासांत नव्हे तर उशिराने आयोगाला मिळते.

कोठडीतील मृत्यूंची आकडेवारीवर्ष     पोलीस     न्यायालयीन    कोठडी    कोठडी२०२०     ७७    १३४३२०१९     ११७    १६०६२०१८    १२९    १६२६२०१७-२०१८     १४८    १६३६२०१६-२०१७     १४६    १६१६२०१५-२०१६     १५२    १६७०२०१४-२०१५     १३३    १५८९२०१३-२०१४     १४०     १५७७३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत स्रोतराष्ट्रीय मानवाधिकार आयोग

२०१९ मध्ये पोलीस कोठडीत मरणाऱ्यांत ७५ हे फारच गरीब, १३ दलित किंवा अनुसूचित जमातीचे, १५ मुस्लिम होते. ३७ जण हे चोरी, लहानमोठे गुन्ह्यांत आरोपी होते. पाेलीस कोठडीत सर्वात जास्त १४ मृत्यूच्या घटना या उत्तरप्रदेश, ११ तमिळनाडुत, बिहार, मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी नऊ, महाराष्ट्र व राजस्थानात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता. 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू