शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:16 AM

ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे.

- सुरेश डुग्गर जम्मू : जम्मू-काश्मिरात गेल्या १२ तासांत झालेल्या तीन चकमकीत ८ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, या चकमकीत पोलीस उपअधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी ठार झाले आहेत. यात अनेक सुरक्षारक्षक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.एक दिवसापूर्वीच या अतिरेक्यांनी पोलीस दलावर गोळीबार केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. अधिकाºयांनी सांगितले की, तपास मोहिमेदरम्यान सुरक्षा दल जिल्ह्याच्या ककरियाल भागात एका घराजवळ पोहोचले आणि अतिरेक्यांना घेरले. त्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलात सीआरपीएफ, पोलीस आणि सैन्याचे जवानही सहभागी होते.जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांना शोधण्यासाठी बुधवारी तपास मोेहीम सुरू केली होती. यात ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. या अतिरेक्यांचे वय १८ ते २२ च्या दरम्यान आहे.पोलिसांनी सांगितले की, या चकमकीत ३ अतिरेकी मारले गेले असून, पोलीस उपाधीक्षक मोहनलालसह आठ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सीआरपीएफचे जवान आणि तीन पोलिसांचा समावेश आहे. जखमींना कटराच्या नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अधिकाºयांनी सांगितले की, अतिरेक्यांनी बुधवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. त्यानंतर अतिरेक्यांना पकडण्यासाठी जम्मू आणि रियासी जिल्ह्यात झज्जर कोटली वन क्षेत्रात मोहीम सुरू करण्यात आली.कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये तीन अतिरक्यांना ठार मारण्यात जवानांनी यश मिळविले आहे.बिस्कीट खाऊन पळालेतपास मोहीम सुरू असताना अतिरेकी ककरियालच्या जंगलात पळून गेले होते. ग्रामीण भागातील एका रहिवाशाने सांगितले की, तीन जण रात्री आठच्या सुमारास आले आणि कपडे व जेवण मागितले.त्यांनी बिस्कीट खाल्ले, पाणी पिले आणि रात्री ९.१० वाजता निघून गेले.अतिरेक्यांनी वाहनाची मागणी केली; पण आमच्याकडे कोणतेच वाहन नाही, असे या ग्रामस्थाने सांगितले.या अतिरेक्यांनी त्या ग्रामस्थाला आपला मोबाईल फोन बंद करण्यास सांगितले होते. हे अतिरेकी येथून निघून जाताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याची सूचना दिली.सोपोरमध्ये ‘जैैश’च्या दोघांना टिपलेउत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी गुरुवारी जैश-ए-मोहंमदच्या दोन अतिरेक्यांना चकमकीत ठार मारले. मृतांत अली या टोपणनावाचा खूप जुना अतिरेकीही आहे.सोपोर येथे गुरुवारी पहाटे सुरक्षा दले आणि पोलिसांनी चिणकीपोरा भागाला घेरले. या भागात जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना तेथे तैनात करण्यात आले.अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला व चकमक सुरू झाली. त्यात पाकिस्तानचे अली ऊर्फ अथहर आणि झिया-ऊर-रहमान मारले गेले, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश आहे.२०१४ मध्ये अली काश्मीर खोºयात शिरला होता. त्याचा उत्तर काश्मीरमध्ये नागरिकांना ठार मारण्यात व सुरक्षा दलांवर हल्ले व दूरनियंत्रकांद्वारे स्फोट घडवून आणण्यात हात होता.यावर्षी जानेवारी महिन्यात त्याने दूरनियंत्रकाद्वारे घडवून आणलेल्या स्फोटात चार पोलीस ठार झाले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान