शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:37 IST

Car Accident In Uttar Pradesh: कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी कार चालवत असताना चालकाला झोप आली. त्यामुळे ही कार पुलावर आदळून पलटली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. मात्र अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती देताना बुलंदशहर पोलिसांनी सांगितले की, जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जानीपूर चंदोस तिठ्याजवळ एक स्विफ्ट कार पुलावर आदळली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. या कारमधून एखाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते. पैकी एक महिला बचावली तर इतर पाच जणांचा जळून मृत्यू झाला.  

दिल्लीतील मालवीयनगर येथील रहिवासी तंबीज अहमद हे आपल्या आणि त्यांच्या भाओजींच्या कुटुंबीयांसह एका लग्नसोहळ्यासाठी बदायूं येथील एका गावात आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते दिल्लीला परत जात होते. त्या प्रवासादरम्यान, आज पहाटे त्यांच्या कारला हा अपघात झाला. या अपघातात तंबीज अहमद, त्यांचे भाओजी जुबैर, सलजनिदा, त्यांची पत्नी मोमिना आणि भाओजींचा अडीच वर्षांचा मुलगा जैनुल यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात गुलनाज ही एकमेव महिला बचावली आहे.

कार चालकाला झोप आल्याने कार पुलावर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पीडितांच्या नातेवाईकांनी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पुलावर आदळून तिला आग लागल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातcarकारfireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश