शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अरुणाचलमध्ये दरडी कोसळून बसमधील पाच जवानांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:09 AM

अरुणाचल प्रदेशच्या लोअर सियांग जिल्ह्यात भूस्खलनामुळे प्रचंड आकाराची दरड इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या बसवर कोसळल्याने पाच जवान मृत्युमुखी पडले, तर ६ जवान जखमी असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या लोअर सियांग जिल्ह्यात भूस्खलनामुळे प्रचंड आकाराची दरड इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या बसवर कोसळल्याने पाच जवान मृत्युमुखी पडले, तर ६ जवान जखमी असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे झाला.लोअर सियांग जिल्ह्याच्या लिकाबाली या मुख्यालयाच्या कॅम्पमधून हे जवान बसने सीमेपाशी निघाले होते. त्याच वेळी मुख्यालयापासून पाच किलोमीटरवरच डोंगराचा मोठा भाग भाग प्रचंड आकाराच्या दगडासह पावसामुळे खाली आला आणि बसवर कोसळला. बसर-अकाजान मार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये एकूण २0 जवान होते. ही संपूर्ण बसच त्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्यामुळे जवानांना बाहेर काढण्यात खूप अडचणी आल्या. त्या वेळी जोरात पाऊ सही सुरू होता.लोअर सिआंगच्या पोलीस अधक्षकांनी सांगितले की, भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग माती व प्रचंड आकाराच्या दगडासह आयटीबीपीच्या २० जवानांच्या मिनी बसवर जाऊन पडला. चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा मृत्यू रुग्णालयात झाला. सर्व जखमींना हेलिकॉप्टरने दिब्रुगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्याच आठवड्यात इटानगरया राजधानीच्या शहराजवळच भूस्खलन झाले होते. त्या वेळीही डोंगराचा प्रचंड भाग खाली आला होता. त्या वेळी तिथे ४ मजूर मृत्युमुखी पडले होते. दरवर्षी इरुणाचल प्रदेशात पावसाळ्यात सतत दरडी कोसळतात आणि भूस्खलनही होत असते. (वृत्तसंस्था)रस्त्यांची अवस्था भयानकसंपूर्ण राज्यात रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. काही ठिकाणी कच्चे रस्ते, काही भागांत अरुंद रस्ते आणि काही भागांमध्ये रस्ते नसल्यात जमा अशी स्थिती आहे.त्यामुळे वाहतूक कायम संथ गतीनेच सुरू असते. पावसाळ्यात तर त्या रस्त्यांवरून वाहने चालविणे ही कसरतच असते. सदर बसही संथ गतीनेच सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघात