शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:50 IST

काॅंग्रेसपक्षाला मेघालयमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षसमोर नवे संकट उभे केले आहे.

ठळक मुद्देएकूण साठ सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 30 सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार असून पुढील वर्षी नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. 

शिलॉंग- कॉंग्रेस पक्षाला मेघालयमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले आहे. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर इतर तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. या इतर तिघांमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या एका आमदाराचा व दोन अपक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी आपले राजीनामे विधानसभेचे मुख्य सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.कालच कॉंग्रेसचे आमदार पी.एम. साइयाम यांनी राजीनामा दिला होता. सलग दोन दिवस चाललेल्या या राजीनामा सत्रामुळे विधानसभेत कॉंग्रेसचे आता केवळ 24 आमदार राहिले आहेत.कॉंग्रेसचे मेघालयातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री रॉवेल यांनी या राजीनाम्याबद्दल बोलताना नंतर सांगितले, "आज राजीनामा देणारे आठ आमदार पुढील आठवड्यामध्ये नॅशनल पिपल्स पार्टीमध्ये सहभागी होणार आहेत." एकूण साठ सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 30 सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार असून पुढील वर्षी नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. आज राजीनामा दिलेल्या सदस्यांनी यापुर्वी मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात बंड केले होते. या पाच आमदारांमध्ये चार आमदार संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये होते. मात्र त्यांना संगमा यांनी मंत्रिमंडळातून वगळले होते. या आठ जणांनी माझ्याकडे राजीनामे सादर केले आहेत असे विधानसभेचे प्रमुख सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांनी सांगितले. 

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेस