पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:44 IST2025-04-11T13:43:42+5:302025-04-11T13:44:56+5:30

First photo of Tahawwur Rana :

first photo of tahawwur rana while US handed over him to NIA; But why didn't he show his face This is cause | पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण

पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण

मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वुर हुसैन राणाला (Tahawwur Rana) गुरुवारी रात्री कडेकोट बंदोबस्तात पटियाला हाऊस न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने त्याला १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. एनआयएने न्ययालयाकडे २० दिवसांची कोठडी मागितली होती. याच्या काही तासांनंतरच, तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो, जेव्हा अमेरिकन मार्शल्सनी कॅलिफोर्निया येथे तहव्वुर राणाला एनआयएकडे सोपले तेव्हाच आहे. यानंतर राणाला कडेकोट बंदोबस्तात भारतात आणण्यात आले. दिल्लीतील पालम विमानतळावर सायंकाळी 6.22 ला त्याचे विमान उतरले.

तहव्वुर राणाच्या पायात अन् कमरेला साखळदंड - 
अमेरिकन न्याय विभागाने (US Justice Department) तहव्वुर राणाचे (Tahawwur Rana) फोटो जारी केले आहेत. यात तो अमेरिकन मार्शल्ससोबत आणि कारागृहातील कैद्यांच्या वर्दीत दिसत आहे. अमेरिकेने जारी केलेल्या या फटोमध्ये अमेरिकन मार्शल्स तहव्वुर राणाला भारताकडे सोपवताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, या फटोत राणाच्या कमरेला आणि पायात साखळदंड दिसत आहेत.

का दाखवला नाही तहव्वूर राणाचा चेहरा? -
तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) भारतात आणून एक दिवस झाला आहे. मात्र अद्याप त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. आता यामागचे एक मोठे कारण समोर आले आहे. भारतात पोहोचल्यानतंर, राणाचा एक फोटो समोर आला होता. मात्र, त्यातही त्याचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. खरे तर, अद्याप तहव्वुर राणाची ओळख परेड झालेली नाही, यामुळे त्याचा चेहरा दाखवला जात नाहीये. ओळख परेडनंतरच त्याचा चेहरा अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाऊ शकतो.
 

Web Title: first photo of tahawwur rana while US handed over him to NIA; But why didn't he show his face This is cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.