आधी नोकरीवरुन काढलं, महिलेने थेट धमकीचा फोन केला; TCS मधील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:49 PM2023-11-16T17:49:30+5:302023-11-16T17:50:03+5:30

आरोपी महिला बेळगावची रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First fired, woman makes direct threatening phone call; Panic spread among employees at TCS | आधी नोकरीवरुन काढलं, महिलेने थेट धमकीचा फोन केला; TCS मधील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली

आधी नोकरीवरुन काढलं, महिलेने थेट धमकीचा फोन केला; TCS मधील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली

काल बेंगळुरू येथील टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस मध्ये धमकीचा फोन आला, यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली. या फोनमधून  कार्यालयात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या कॉलचा तपास केल्यानंतर टीसीएस मधील कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा कॉल टीसीएसच्या एका माजी कर्मचाऱ्याने केला होता. त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने राग आला होता. माजी कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत हा कॉल केला होता. 

Rahul Gandhi : "लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बेंगळुरूपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळगावची रहिवासी आहे. या महिलेला टीसीएसने नोकरीतून काढून टाकले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने कंपनीतील व्यवस्थापकाला फोन केला होता. कॉम्प्लेक्सच्या बी ब्लॉकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी बॉम्ब निकामी पथकासह बी ब्लॉक परिसराची पाहणी केली आणि काहीही आढळले नाही. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी गोवा सीमेजवळ असलेल्या बेळगावी जिल्ह्यातील तिच्या गावी आरोपी महिलेचा जबाब  घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी आणि तिच्या पालकांशी चर्चा केली आहे. आरोपी महिला तिच्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर रागावली होती कारण त्यांनी तिला उच्च शिक्षणानंतर पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षात महिलेने पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी टीसीएसचा राजीनामा दिला होता.

मात्र ती परत आल्यावर कंपनीने तिला परत घेण्यास नकार दिला. यामुळे ती हताश झाली होती. या महिलेला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या महिलेचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत.

Web Title: First fired, woman makes direct threatening phone call; Panic spread among employees at TCS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.