पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:55 AM2019-12-17T10:55:53+5:302019-12-17T10:57:25+5:30

कुरापतखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय जवानांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

Firing at Pak overnight control lines; 3 intruders and 2 Pak soldiers killed by indian soldiers | पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

googlenewsNext

नवी दिल्लीः कुरापतखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय जवानांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पाकिस्तानकडून रात्रभर भारताच्या बाजूकडच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबाराच्या आडून घुसखोरांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळच्या भागात गोळीबार करण्यात आलेला आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या उत्तरादाखल भारतीय जवानांनी पाकचे दोन सैनिक आणि तीन घुसखोरांना ठार केलेलं आहे. इतर चार सैनिक जखमी झाले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या चौक्यांचंही नुकसान झालं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये मध्यरात्री पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. तसेच राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमधल्या सुंदरबनी आणि नौशेरामध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला आहे. या गोळीबारात भारतीय सेनेचे जवान सीजे गणपती शहीद झाले. तर इतर एक जवान जखमी झाला आहे. 
 

Web Title: Firing at Pak overnight control lines; 3 intruders and 2 Pak soldiers killed by indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.