बर्थ डे पार्टीदरम्यान गोळीबार, एका तरुणीसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:37 IST2024-12-24T07:37:18+5:302024-12-24T07:37:40+5:30
रविवारी रात्री उशिरा २ वाजता पिंजोर हॉटेलच्या पार्किंगमध्ये हा गोळीबार झाला

बर्थ डे पार्टीदरम्यान गोळीबार, एका तरुणीसह तिघांचा मृत्यू
पंचकुला (हरयाणा) : येथे एका बर्थ डे पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. यात २ तरुण व एका तरुणीचा समावेश आहे.
रविवारी रात्री उशिरा २ वाजता पिंजोर हॉटेलच्या पार्किंगमध्ये हा गोळीबार झाला. हा टोळीयुद्धाचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आहे. मृत दोन्ही तरुण विक्की व विपीन दिल्ली येथील रहिवासी असून तरुणी निया ही हिसार येथील रहिवासी आहे. तिघे जण गाडीत बसलेले असताना अचानक एक गाडी तेथे आली आणि अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मृत विक्की या ३० वर्षीय युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.