भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 10:15 IST2023-04-12T10:14:36+5:302023-04-12T10:15:26+5:30

मिलिट्री स्टेशनवर हा हल्ला झालाय की सैन्यातल्याच कोणीतरी हा हल्ला केल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय.

Firing at army base in Bhatinda, punjab, four officers died | भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू

भटिंडातील लष्करी तळावर गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू

पंजाबमधून देशाला हादरविणारी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाला आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

मिलिट्री स्टेशनवर हा हल्ला झालाय की सैन्यातल्याच कोणीतरी हा हल्ला केल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. या हल्ल्यानंतर शीघ्र कृती दलाने परिसराचा ताबा घेतला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याचबरोबर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. 

भटिंडाचे मिलिट्री स्टेशन हे खूप जुने आहे. पूर्वी ते शहराच्या बाहेर होते. परंतू, जसजसा शहराचा विस्तार होत गेला आता ते शहरात आले आहे. कोणत्याही सामान्य वाहनाद्वारे मिलिट्री स्टेशनच्या बाहेरपर्यंत जाता येते. परंतू, कडक सुरक्षा असल्याने बाहेरील व्यक्ती आत घुसू शकत नाही. 

पहाटे साडे चारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. ऑफिसर्स मेसमध्ये हा गोळीबार झाला आहे. यामुळे सैन्य अधिकाऱ्यांतील आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचा अंदाज लावला जात आहे. सध्या फायरिंग थांबली असून काही वेळापर्यंत फायरिंग सुरु होती, असे सांगण्यात आले होते. 

Web Title: Firing at army base in Bhatinda, punjab, four officers died