पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 20:20 IST2019-12-30T20:12:10+5:302019-12-30T20:20:24+5:30

Fire Near PM Narendra Modi's House : संध्याकाळी 7:25 वाजताच्या सुमारास आग लागली. 

Fire has been reported at Prime Minister's residence at 7, Lok Kalyan Marg around 7:25 pm today | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आग लागल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील  7 लोककल्याण मार्ग येथील नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एलकेएम कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात  संध्याकाळी 7:25 वाजताच्या सुमारास ही आग लागली. 

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे. तसेच, सुत्रांच्या माहितीनुसार ही आग किरकोळ असल्याचे समजते. तसेच, पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्विट करून सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यलयाला ही आग लागली नाही. तर एलकेएम कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. 

 

Web Title: Fire has been reported at Prime Minister's residence at 7, Lok Kalyan Marg around 7:25 pm today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.