इमारतीला आग, दोघींचा मृत्यू

By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:28+5:302017-01-14T00:06:28+5:30

इमारतीला आग, दोघींचा मृत्यू

Fire at the building, the death of both of them | इमारतीला आग, दोघींचा मृत्यू

इमारतीला आग, दोघींचा मृत्यू

ारतीला आग, दोघींचा मृत्यू
जव्हार : शहरातील तारपा चौकातील इमारतीला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मायलेकींचा मृत्यू झाला. संपूर्ण इमारत खाक झाली असून, मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. मृत्यू पावलेल्या माय-लेकींची नावे आयेशा हबीब कुरेशी व मेहरु न हबीब कुरेशी अशी आहेत. त्या गाढ झोपेत असतानाच गुदमरून व होरपळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील मुले आणि नातवंडे दुसर्‍या घरी झोपलेले असल्याने ते वाचले. आग लागलेले घर रोहित कोल्हे यांचे होते. मात्र, या घरात दोन गाळे पाडले होते. कोल्हे यांच्या गाळ्यात प्रिंटिंग प्रेस होती, तर दुसर्‍या गाळ्यात मृत्यू पावलेल्या माय-लेकींचे कपड्याचे दुकान होते. या इमारतीत लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने, ती लवकरच खाक झाली. पहाट असल्याने, आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कपड्याच्या दुकानाला आग लागताच, बाजूच्या खोलीतून आरडाओरडा सुरू झाला, तसेच धूर व आगीचे लोळ निघायला सुरुवात होताच, कोल्हे कुटुंब बाहेर पळाले. त्यांचे संपूर्ण घर जळले. मात्र, कुटुंब बचावले, परंतु त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे बाजूची इमारत बचावली. (प्रतिनिधी)
.........................

Web Title: Fire at the building, the death of both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.