दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 00:08 IST2024-01-19T00:08:18+5:302024-01-19T00:08:32+5:30
Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू
पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीतमपुरामध्ये एका इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. तसेच घरात अडलेल्या ७ जणांना बाहेर काढले. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.