Delhi Factory Fire : दिल्लीतील फॅक्टरीला भीषण आग; इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे जवानही अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:54 AM2020-01-02T10:54:43+5:302020-01-02T10:55:00+5:30

Delhi Factory Fire : एएनआयनुसार पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या  जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

Fire breaks out at factory in Delhi; Fire brigade personnel were also trapped when the building collapsed | Delhi Factory Fire : दिल्लीतील फॅक्टरीला भीषण आग; इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे जवानही अडकले

Delhi Factory Fire : दिल्लीतील फॅक्टरीला भीषण आग; इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे जवानही अडकले

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीच्या फॅक्टरींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज सकाळी पीरागढी भागातील एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे इमारत कोसळल्याने यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. 

एएनआयनुसार पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या  जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याचवेळी इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला आणि इमारत कोसळली. या इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवानही असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य़ सुरू असून 30 ते 35 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. 


ही बॅटरी फॅक्टरी बनविण्याची असून बॅटरीमध्येच आग लागल्याने स्फोट झाले. यामुळे ही आग पसरत गेली आणि इमारतीचा काही भाग कोसळला. गेल्या महिन्यांत मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या होत्या. अनाज मंडीमध्ये दप्तरांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 40 तर हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जण ठार झाले होते.


Web Title: Fire breaks out at factory in Delhi; Fire brigade personnel were also trapped when the building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.