शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 17:48 IST

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

लखनौ - उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. या अपघात प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर, त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपाता असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. 

भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या उन्नाव येथील महिलेच्या कारला रविवारी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पीडित महिला तिचा वकील गंभीर जखमी झाले होते. तर महिलेची मावशी आणि काकीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, आज या प्रकरणी बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर,  त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि अन्य आठ जणांविरोधात, हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कृत्य आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्नाव येथील बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपा आमदार कुलदीप सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात  सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह  सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. नेमके काय आहे प्रकरण?  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर  व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ते मरण पावले होते.    

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी