शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

West Bengal: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 11:29 IST

West Bengal: सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमदत साहित्यातील ताडपत्रीचा ट्रकच नेलाकेंद्रीय सुरक्षा दलांची घेतली मदत घेतल्याचा आरोपसुवेंदू अधिकारी आणि बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद अद्यापही शमताना दिसत नाही. उलट, तो वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार टक्कर देत निवडणुकीत पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपने विधीमंडळ नेता आणि विरोधी पक्षनेते बनवले. याच सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. (fir lodged against bjp leader suvendu adhikari in medinipur district west bengal)

यास या चक्रिवादळाने पश्चिम बंगालच्या काही भागांना जोरदार तडाखा दिला. यानंतर मदतकार्य अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

ताडपत्रीचा ट्रकच घेऊन गेले!

कोंटाई नगरपालिकेत काम करणाऱ्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला आहे. यामध्ये २९ मे रोजी हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. यामागे सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी असून, केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप डे याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

“मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारण