Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 04:53 PM2021-06-05T16:53:19+5:302021-06-05T16:56:33+5:30

Coronavirus: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

amartya sen criticises modi govt over corona situation in india | Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

Next
ठळक मुद्देनोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे केंद्र सरकारवर ताशेरेभारत कोरोनाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता, मात्र... सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर झाली

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसला. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्यामुळे ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला. यावरून विरोधकांनी आणि तज्ज्ञांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिले आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, असे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. (amartya sen criticises modi govt over corona situation in india)

केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले की, भारतच संपूर्ण जगाला वाचवू शकेल. मात्र, त्याच कालावधीत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि अन्य समस्याही मोठ्या प्रमाणात समोर आल्या. लोकांना त्याचा विळखा बसत असताना सरकार दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत, या शब्दांत अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

“...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक

भारत कोरोनाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता

मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. भारत कोरोना संकटाचा सामना योग्य प्रकारे करू शकला असता. मात्र, सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नाही, असे सेन म्हणाले. यासह अन्य काही मुद्द्यांवरून अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

दरम्यान, देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. 
 

Web Title: amartya sen criticises modi govt over corona situation in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.