FIR against Asaduddin Owaisi: 'आम्ही घाबरणार नाही'! दिल्ली पोलिसांनी केलेल्या एफआयआरवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 17:29 IST2022-06-09T17:28:38+5:302022-06-09T17:29:45+5:30
दिल्ली पोलिसांनी बुधवारी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत ओवेसींशिवाय, यती नरसिंहानंद, नूपूर शर्मा, नवीन जिंदल आंच्यासह अनेकांची नावे आहेत.

FIR against Asaduddin Owaisi: 'आम्ही घाबरणार नाही'! दिल्ली पोलिसांनी केलेल्या एफआयआरवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले...
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी, त्यांच्याविरोधात भडकाऊ वक्तव्य केल्याबद्दल नोंदवण्यात आलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, "मला एफआयआरचा एक उतारा मिळाला आहे. मी पाहिलेली ही अशी पहिलीच एफआयआर आहे, ज्यातून गुन्हा काय, हेच स्पष्ट होत नाही. आम्ही याला घाबरणार नाही. द्वेषयुक्त भाषणांवर टीका करणे आणि द्वेषयुक्त भाषणे देणे याची तुलना होऊ शकत नाही."
दिल्लीपोलिसांनी बुधवारी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत ओवेसींशिवाय, यती नरसिंहानंद, नूपूर शर्मा, नवीन जिंदल आंच्यासह अनेकांची नावे आहेत.
यासंदर्भात, दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडकावू वक्तव्ये करून समाजातील वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त मेसेज पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
विशेष सेलच्या 'इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन' (IFSO) युनिटने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.