शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 23:50 IST

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते,

नवी दिल्ली - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या नावाने लेखक जयभगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींवर पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं प्रकाशन दिल्ली भाजपा कार्यालयात करण्यात आलं होतं. मात्र या वादावरुन महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपाने हे पुस्तक मागे घेतलं आहे. लेखक जयभगवान गोयल यांनी या प्रकारावर माफी मागितली आहे. 

या प्रकारावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशभरात कालपासून लोकांमध्ये  या पुस्तकामुळे नाराजी व्यक्त होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे असं जावडेकरांनी सांगितले. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते, कल्याणकारी राज्य त्यांनी चालवलं त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोकं करतात. अतुलनीय व्यक्तिमत्वाची तुलना केली जाऊ शकत नाही. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलन झालं. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. हा मुद्दा इथे संपवावा अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. 

दरम्यान, जाणीवपूर्वक शिवरायांचा अवमान भाजपाकडून केला जातो. जनतेत जो आक्रोश केला जात होता. विरोधक राजकारण करतंय असं भाजपा आरोप करत होती. मात्र ही जनभावना होती असं मतं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपाकडून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवण्यात येतात. त्याचा जनतेत काय प्रतिक्रिया उमटतात हे भाजपा पाहतं. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा हा विषय आहे. विषय संपवा हे जनता ठरवणार आहे असं विधान अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज