शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग सुरु

By admin | Updated: November 15, 2016 22:56 IST

व्हॉट्सअॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग येणार येणार म्हणून अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. व्हॉट्सअॅपने बिटा व्हर्जन साठी व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा चालू केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15 - व्हॉट्सअॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग येणार येणार म्हणून अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली.  व्हॉट्सअॅपने बिटा व्हर्जन साठी व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा चालू केली आहे. मात्र व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यासाठी एकच अट सध्या आहे ती म्हणजे तुम्ही ज्या व्हॉट्सअॅप युझर्सला  व्हिडीओ कॉल करत आहेत त्याने सुद्धा व्हॉट्सअॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुम्ही  व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता .

व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवीन नवीन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युझर्स ची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे
तस बघीतले तर मेसेंजिंग अॅप च्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही. कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.
 
व्हिडीओ कॉलिंग कसे कराल ?
तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट केले कि चॅट च्या बाजूला असलेल्या कॉल्स ला क्लिक केल्यानंतर वर उजव्या बाजूला प्लस साइन असलेले कॉलिंग चा सिम्बॉल दिसेल . त्याला क्लिक केले कि कॉन्टॅक्ट ची लिस्ट तुमच्या समोर येईल त्यामध्ये प्रत्येक कॉन्टॅक्ट समोर व्हॉइस  आणि व्हिडिओ कॉल असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसेल . त्यापैकी व्हिडीओ कॉलिंग लोगो वर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता मात्र ज्याला तुम्ही व्हिडीओ कॉल करताय त्याने व्हॉट्सअॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुमचा व्हिडीओ कॉल पूर्ण होईल .