शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:42 IST

वीस वर्षांपूर्वीच्या मोटार अपघात प्रकरणात तेव्हा २० वर्षे वयाच्या असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने ६० लाख रुपयांहून अधिक भरपाई मंजूर केली आहे.

नवी दिल्ली : वीस वर्षांपूर्वीच्या मोटार अपघात प्रकरणात तेव्हा २० वर्षे वयाच्या असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने ६० लाख रुपयांहून अधिक भरपाई मंजूर केली आहे. या अपघातानंतर ती व्यक्ती दिव्यांग झाली व दीर्घकाळ आजारी होता. त्याचा मृत्यू २०२१मध्ये झाला. या व्यक्तीचे नाव शरद सिंह असून, ते बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना २००१ मध्ये कारचालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. ते २० वर्षे अंथरुणाला खिळून होते. या काळात त्यांची आई-वडिलांनी  सेवा केली. 

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले, ते न्यायालयाने मान्य केले. त्यामुळे तिने अखेर ही लढाई जिंकली.

भरपाईची कशी ठरवली? 

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ते एक हुशार विद्यार्थी होते. त्याची किमान ५,००० रुपये मासिक कमाई गृहीत धरली जाऊ शकते. भविष्यातील संभाव्य कमाईत ४० टक्के वाढ गृहीत धरून १५.१२ लाख भरपाई मंजूर केली. त्याशिवाय परिचारकांचे खर्च, वेदना, वैवाहिक संधी गमावणे, वैद्यकीय खर्च आदी गोष्टी, भरपाई रकमेवरील ९ टक्के  व्याज असे धरून ६० लाख रुपयांची मदत न्यायालयाने मंजूर केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mother Wins 20-Year Fight: ₹60 Lakh Compensation Granted

Web Summary : Supreme Court awarded ₹60 lakh compensation to a mother after her son's death, 20 years after a debilitating accident. The accident left him disabled, requiring constant care until he died in 2021. The compensation covers medical expenses, lost earnings, and suffering.
टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीCourtन्यायालय