शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्थायी समितीच्या सदस्यांची यादी जाहीर *शिवसेनेमुळे अडली होती यादी *भाजपाचे संजय वाघुले यांना संधी

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणार्‍या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणार्‍या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेत तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.
स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह रिपाइंचे रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड केली गेली आहे. २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली नावे पीठासीन अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली होती. परंतु, शिवसेनेमध्ये काही नावांवरून मतभेद झाल्याने अखेर उपायुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करून ही महासभाच पूर्णवेळेसाठी तहकूब केली होती.
दरम्यान, सोमवारीसुद्धा दुपारी २ वाजता महासभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेेनेत नावावरून मतभेद झाल्याने ही यादी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर, १५ मिनिटांसाठी महासभा तहकूब करून त्यानंतर सुरू झालेल्या सभेत शिवसेनेच्या नावांवर एकमत झाले. त्यानुसार, शिवसेनेतून ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, दशरथ पालांडे, उमेश पाटील आणि संभाजी पंडित यांची नावे जाहीर झाली. तर, भाजपामधून संजय वाघुले यांची पुन्हा निवड झाली. तसेच राष्ट्रवादीकडून सुहास देसाई आणि प्रमिला केणी आणि काँग्रेसकडून यासीन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली.
सुरुवातीला शिवसेना भाजपाला स्थायी समिती सोडणार नसल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु, अखेर शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेवटच्या वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाच्या वाटेला येणार आहेत.
.....................